महानुभाव
पंथ विषयी
इ.स.१२००
च्या सूमारास महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय उदयास आला. “महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य
सः महानुभावः” या
दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. या संप्रदायाची
संस्थापना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी
केलेली
असली तरी, मूळात
त्यांनी या पंथास स्वतः कोणतेही नांव दीलेले नव्हते. सर्वज्ञ
श्रीचक्रधरस्वामींच्या उत्तरापंथे गमना नंतर, जेव्हा पंथाची धुरा नागदेव
आचार्यांच्या खांद्यावर आली, त्याकाळी
या पंथास “भटमार्ग” असे संबोधल्या जाऊ लागले. “महानुभाव पंथ” या नावने हा पंथ जरी आज ओळखला
जात असला, तरी
त्याची “महात्मा
पंथ”,”अच्युत
पंथ”,”जयकृष्णी
पंथ”,”परमार्ग” अशी अन्य नावेही
पूढील काळात उदयास आली. काही भागात “अच्युतपंथ” उत्तर भारतात “जयकृष्णीपंथ” ही नावे याच पंथाची आहेत. मराठी
भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान क्षेत्रात मोलाची भर
घातली आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या
शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने मराठीतून सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये
अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. संप्रदाय
प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी विषद केलेल्या तत्त्वज्ञानाचा थोडक्यात गोषवारा
असा -- द्वारकाधीश श्रीकृष्ण, सैंह्याद्रीचे श्रीदत्तात्रेय, द्वारावतीचे श्रीचांगदेवराऊळ, ऋद्धिपूरचे श्रीगोविंदप्रभू आणि
प्रतिष्ठानचे श्रीचक्रधर असे पाच जीवोद्धारक अवतार आहेत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि
मूळ चार तत्त्वे(पदार्थ) आहेत. “देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत,परमेश्वर नित्यमुक्त आहे व
प्रपंच अनित्य आहे” असे या
तत्त्वज्ञानाचे मुळ सूत्र आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर
हे स्वतः गुजराथी भाषीक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी
प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आद्यआचार्य नागदेव यांनी कटाक्षाने
आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ
शिष्यांकडून (नको गा केशवदेया:येणें,माझिया म्हातारिया नागवतील:ः
किंवा “तुमचा
अस्मात् मी नेणे गा:मज श्रीचक्रधरे निरुपल्ली
मर्हाटी:तियाचि पुसा: स्मृ.स्थ.) असे बोलुन त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून
घेउन मराठीचा मान कायम ठेवला. श्रीचक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत
शिकलेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृतप्रचुर वाङ्मयाच्या वळणावर झाली व
संस्कृत भाषेवर त्यांच्या मोठा ताबा असल्याने या सर्वच ग्रंथरचना अत्यंत
प्रभावशाली झाल्या आहेत. या ग्रंथ निर्मीती काळात प्रारंभी भाष्य व महाकाव्यसदृश सलग
ग्रंथरचना झाली. व पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या,धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली.
पंडित आनेराजांच्या लक्षणरत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ व
सातकाव्यांच्या साती ग्रंथावरील टीपा यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे
सूत्रभाष्य, सूत्रलक्षणे, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र, यांची रचना मराठीच्या
प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या
या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१)चरित्रग्रंथ, (२)सूत्रग्रंथ, (३)काव्यग्रंथ, (४)भाष्य व महाभाष्यग्रंथ, (५)साधनग्रंथ, (६)तात्त्विकग्रंथ, (७)गीता टीका,(८)आख्यानक काव्ये, (९)स्थलवर्णनपरग्रंथ, (१०)इतिहासग्रंथ, (११)स्फुटरचना (१२)निरुक्त (१३)महानिरुक्त (१४)आरत्या (१५)स्तोत्रे (१६)संदर्भग्रंथ अशा व इत्यादी विविध प्रकारांत करता येईल. भाष्करभट बोरीकर हे
पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी
आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना,लीळाचरित्र, द्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत
पोथ्या त्या भागात चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर पं.हिराइसा, पं.धानाइसा, पं.पोमाइसा, पं.नागाइसा, पं.अनंतदेव आदी अनेक शिष्यांकडून
आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते
करताना त्यांनी इतरांच्या “वासना” ही नमूद केल्या. त्यामुळे या
ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. या चोरी
प्रकारानंतर मात्र काही आन्मायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ लिपीबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, आपली धर्ममते कालौघात भ्रष्ट होऊ
नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे मुळ व पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून
त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यात येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये
सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक ४५चे वर लिप्या तयार झाल्या त्यामुळे पंथिय
बहुतेक ग्रंथ यां सांकेतिक लिपीतच आढळतात.
इ.स. १२व्या शतकात मानवतेला
लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव
पंथाच्या माध्यमातून केला. सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक व बाराव्या शतकातील महानुभाव
पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व
साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. अश्या या प्रवाहविरुद्ध
विचारधारेमुळे श्रीचक्रधरस्वामींना महदाश्रम, ब्रम्हसानासारख्या राजाश्रीत
धर्ममार्तंडांनी कडतरुन विरोध केला. व याचे पर्यावसान कट कारस्थानांत झाले. स्वामी स्वतः अहींसेचे
पूरस्कर्ते असल्याने या विरोधकांचा स्वामींनी कींचीतही विरोध केला नाही. याऊलट
महाराष्ट्राचा त्याग करण्याचा त्यांनी नीर्णय घेतला, व अल्पकाळातच महाराष्ट्राला
आपल्या प्रज्वल वीचारधारेपासून पोरके करुण स्वामी उत्तरेकडे निघुन गेले. जो त्रास
श्रीचक्रधरस्वामींच्या आधुनिक व ज्वलंत विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजे श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या
प्रवाहाविरुद्ध पोहणार्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व
साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment