Friday, 12 January 2018

About Mahanubhav Panth in Marathi

महानुभाव पंथ पंचकृष्ण परमेश्वर अवतार

महानुभाव पंथ

महानुभाव पंथ हा एक हिंदुधार्मांतर्गत पंथ आहे. परंतु सत्य, अहिंसा, समतावादी असून ज्ञान, भक्ती, वैराग्य, या तीन्हींनी युक्त, एकनिष्ठ भक्ती करणारा, भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु, श्रीचक्रपाणीप्रभु, श्रीगोविंदप्रभु, सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी हे परमेश्वराचे अवतार मानणारा ज्ञानमार्ग आहे. कलियुगात पूर्णब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात ज्ञानमार्गाची महाराष्ट्रात स्थापना केली तेव्हा पासून आजपर्यंत हा पंथ आपल्या तत्त्वप्रणालीनुसार चालत आहे. पंथाचे मूळ जरी महाराष्ट्रात असले तरी पंथाचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे. अगदी काबुल-कंदाहार पर्यंत हा पूर्णपणे व्दैतवादी पंथ असून जीव, देवता व प्रपंच (जगत) यापासून पूर्णपणे स्वतंत्र असणारा एक नित्यमुक्त परमेश्वराच मोक्ष (मुक्ती) देण्यास समर्थ आहे. हा सिद्धांत या तत्वज्ञानाचा पाया असल्यामुळे त्या परमेश्वराची भक्ती करून त्याचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळविणे हे जीवाचे एकमेव साध्य आहे.

पंच अवतार माहिती- १) भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती- द्वापार युगात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत क्षत्रिय वर्णातील यादव कुळात वसुदेव – देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीला रात्री १२ वा. अवतार घेतला. बालपणी गोकुळ-वृंदावनात खेळ करत दैत्यांना ठार केले व मथुरेत कंसाचा  वध करून वसुदेव-देवकीला बंदिशाळेतून मुक्त केले. अर्जुनाला युद्धभूमीवर श्रीमद्भगवद्गीता सांगितली. उद्धव, कुंती, द्रौपदी, पांडव इत्यादी भक्तांचे रक्षण करून मोक्ष दिला. प्रमुख तीर्थस्थाने:- मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन.

२) श्रीदत्तात्रेय प्रभू- त्रेतयुगात हिमालयातील बद्रिकाश्रामामध्ये ऋषीकुलात अत्रि-अनसुयेच्या पोटी मार्गशीष शुद्ध चतुर्थीला प्रातःकाळी ४ वा. अवतार घेतला. यदुराजा, अलर्कारजा, राणी मदालसा आदी भक्तांना ज्ञान प्रेम देऊन मुक्ती दिली. श्रीदत्तात्रेय प्रभू  अजूनपर्यंत विद्यमान आहेत. त्यांचे दर्शन अमोघ असल्यामुळे दर्शन सर्वांना होत नाही. प्रमुख तिर्थस्थाने :- बद्रिकाश्रम, पांचाळेश्वर, माहूर.

३) श्रीचक्रपाणी प्रभू- कलीयुगात फलटण ( जि. सातारा ) येथे ब्राह्मण वर्णातील कराड शाखेत जनकनायक-जनकाईसाच्या पोटी अश्विन वद्य नवमीला ( शके १०४२ , इ.स. ११२०) सकाळी ९ वा. अवतार घेतला. अनेक दु:खी जीवांचे दु:ख दूर करून सुख दिले. उधळीनाथ इत्यादी ५२ पुरुषांना देवतेच्या विद्यांचे दातृत्व केले. प्रमुख तीर्थस्थाने : फलटण, माहूर, द्वारका.

४) श्रीगोविंद प्रभू- कलीयुगात काटसूरला ( जि. अमरावती) काण्वशाखेत अनंतनायक-नेमाइसाच्या पोटी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला ( शके ११०९, इ.स. ११२० ) रात्री १० वा. अवतार घेतला. ऋद्धपुरला वास्तव्य करून दु:खितांचे दु:ख दूर करता-करता ते संपूर्ण विदर्भाचे ‘राऊळ माय-राऊळ बाप’ झाले. आबाईसा, म्हाइंभट्ट, लक्ष्मीन्द्रभट्ट, कोथळोबा, इत्यादी भक्त त्यांची सेवा करायचे. प्रमुख तीर्थस्थाने:–  ऋद्धपूर आणि परिसर.

५) सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी- कलीयुगात भडोचला ( गुजरात ) लाडसामक शाखेत प्रधान विशालदेव-माल्हणीदेवी हे माता-पिता. भाद्रपद शुद्ध द्वीतीयेला ( शके ११४२, इ स. १२२०) दुपारी १२ वा. अवतार घेतला. राज वैभव सोडून ऋद्धपुरला श्री गोविंदप्रभूपासून परावर शक्ती स्वीकार करून महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण केले. नागदेवाचार्य, पंडित म्हाइंभट्ट, नागुबाईसा, नाथोबा, नीळभट्ट इत्यादी जीवांना ज्ञान-प्रेमाचे दातृत्त्व करून मुक्ती दिली. समाजातील विषमता  दूर करून स्त्री शूद्रांना समान अधिकार देऊन दु:खीतांचे दु:ख हरण केले. प्रमुख तीर्थस्थाने :- पैठण, डोमेग्राम, सिन्नर, बेलापूर, वेरूळ, सावखेडा(खडकुली) जाळीचादेव.



प्रमुख ग्रंथ कर्ते- १) आचार्य श्री नागदेव- महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी उत्तरदिशेला प्रयाण केल्यानंतर आचार्यपदाची धुरा त्यांनी समर्थपणे संभाळली. त्यांच्या जवळ सातशे ते आठशे शिष्य राहत असत, त्याकाळी त्यांची ‘वेधवंती नागदेव’ म्हणून प्रसिद्धी होती. अनेक ग्रंथ त्यांच्या देखरेखी खाली रचले गेले. २) पंडित म्हाइंभट्ट- षड्शास्त्र संपन्न, संस्कृत विद्वान ब्राह्मण, घरी गर्भश्रीमंती होती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वानांना वाद-विवादात पराजित केले होते. श्रीचक्रधरस्वामींपासून परमेश्वर ज्ञानाचा संचार झाल्यावर ते श्रीगोविंदप्रभुंजवळ अनुसरले, त्यांनी मराठी साहित्याला अनमोल देणगी आद्यचरित्र्यग्रंथ ‘लीळाचरित्राच्या’ रूपाने दिली नंतर श्रीगोविंदप्रभू चरित्र लिहिले. बरेचसे स्फुटकाव्ये निर्माण केली.३) केशीराजव्यास- संस्कृत भाषेवर हातखंडा. नागदेवआचार्यांची भेट झाली व संन्यास घेतलानंतर ‘लीळाचरीत्रा’तून श्रीचक्रधरस्वामींनी निरुपण केलेली सूत्रे संकलित करून ‘सुत्रपाठ’ ग्रंथ, दृष्टांतावर दृष्टांतीक, काल्पनिक, मुर्तीप्रकाश, अवस्थाभूतगीत इत्यादी मराठी रचना व रत्नमालास्तोत्र, दृष्टांतस्तोत्र, ज्ञानकलानिधीस्तोत्र, इत्यादी  संस्कृत रचना त्यांनी केली. ४) कविश्वरव्यास (भास्करभट्ट बोरीकर)- अत्यंत रसाळ आणि मंत्रमुग्ध प्रवचनासाठी ते प्रसिद्ध होते. संस्कृत रचना एकदम झटपट करत असत. जसे आकाशात लिंबू फेकून ते खाली येईपर्यंत नवीन श्लोक तयार करायचे. त्यांनी शिशुपालवध व उद्धवगीता हे काव्यग्रंथ व नरविलापस्तोत्र, संस्कृत पूजावसर, मुर्तीवर्णनस्तोत्र, श्रीयाष्टक, विरहाष्टक, मराठी पुजावसर, चालिसाख्यस्तोत्र इ. रचना त्यांनी केल्या. ५)महादाईसा- रूपाईसा हे मूळ नाव. श्रीचक्रधरस्वामींच्या सहवासात असताना सतत प्रश्न विचारत असत म्हणून स्वामींनी तिची प्रशंसा करताना म्हणाले की ‘ही चर्चक, जिज्ञासक आहे’ आद्य मराठी स्त्री कवयित्रीचा मान हा महादाईसाकडे जातो. तिने ‘धवळे’ नावचे श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहवर्णनपर रचना केली. ६) पंडितबास- एक भावनिक कवी, गीतकार, श्रीनागदेव आचार्यांनी प्रथम गीत गाण्याला प्रतिबंध केला. परंतु त्यांची आर्तता, करूणा ऐकून त्यांना गाण्याला अनुज्ञा दिली. त्यांनी ‘वच्छाहरण’ हा काव्य ग्रंथ व धुवे, चौपद्या आरती इत्यादींची रचना केली. ७) परशरामबास, मुरारीमल्लबास, गुर्जरशिवव्यास इत्यादी अनेक ग्रंथ कर्ते आहेत.

पंथाची नावे- १) भट्टमार्ग, २) परमार्ग, ३) महानुभाव पंथ,  ४) जयकृष्णी पंथ

साहित्य–चरित्रग्रंथ

ग्रंथ लेखक सन१) लीळाचरित्र (श्रीचक्रधरस्वामी चरित्र)पं. म्हाइंभट्ट शके १२०४ इ.स. १२८२२) श्रीगोविंदप्रभू चरित्रपं. म्हाइंभट्ट शके १२१० इ.स. १२८८३) स्मृतीस्थळनरेंद्रबास शके १२३५ इ.स. १३१३४) धवळे (काव्य)महदंबा ( महादाईसा ) शके १२०८ इ.स. १२८६

तत्वज्ञानपर मुख्यग्रंथ – १) श्रीमद्भगवद्गीता-    श्रीकृष्ण निरोपित २) सुत्रपाठ -पं. केशीराजव्यास शके १२१२ -१३ इ.स. २९०-९१. ३) स्थळपोथी, महाभाष्य, बंद.

सप्तकाव्य ग्रंथ

ग्रंथकर्तेलेखनकाळ-शके  इ.स.ओवीसंख्या१) रुक्मिणी स्वयंवरनरेंद्रबास१२१५१२९३१८८५२) शिशुपालवधभास्करभट्ट बोरीकर१२३४१३१२१०८७३) उद्धवगीताभास्करभट्ट बोरीकर१२३५१३१३८२७४) वच्छाहरणपंडितबास१२३८१३१६५०३५)सह्याद्रीवर्णनरवळोव्यास१२७५१३५३५१७६) ज्ञानबोधविश्वनाथबास बाळापुरकर१३४०१४१८१२००७) ऋद्धपूर वर्णननारायणव्यास बहाळीये१३४०१४१८६४१

No comments:

Post a Comment