Thursday, 25 January 2018

About Shri krishna in Marathi

श्रीकृष्णचक्रवर्ती महाराज - "कृष्ण" या शब्दातील 'कृष्' या धातूचा अर्थ वीषद करताना अन्वयकार आपल्या 'नामाचे दहा ठाये' या प्रकरणात म्हणतात 'कृष् हा धातू विलेखनी वर्तेः कर्मराहाटीते व्यावर्तीः ते विलेखनःः कर्मराहाटीते व्यावर्तोणिः दुखसाधनालागी जनातें व्यवहारापासौनि आकर्षीः म्हणिजे ओढुनी काढीः तो कृष्णःः तोची प्रतीयुगी पंचकृष्णःः म्हणुनच पांचही अवतारांना पंचकृष्ण म्हणुन संबोधण्यात येते.
महानुभावपंथात श्रीकृष्णचक्रवर्तींचा अवतार हा द्वापार युगात पीता वसुदेवापासून माता देवकी यांच्या गर्भी जन्मलेला गर्भीचा अवतार होय. पौराणीक कल्पनेप्रमाणे किंवा इतर सांप्रदायांच्या मताप्रमाणे महानुभाव पंथियांना श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार म्हणुन मान्य नसून, ते त्याला परब्रम्ह परमेश्वरावतार व संपूर्ण उभयदृश्यावतार माणतात. तद्वतच महानुभाव श्रीकृष्ण अवतारास चतुर्भुज न माणता, 'मनुष्यवेषधारी होती' या श्रीचक्रधरस्वामींच्या उक्तीप्रमाणे द्विभूजच माणतात. ही दोन्ही मते महानुभाव पंथियांची श्रीकृष्ण अवताराबाबतची मोठी मत भिन्नता स्पष्ट करतात.
महानुभावीय मताप्रमाणे श्रीकृष्णचक्रवर्तींचा अवतार हा उभयदृश्यावतार असल्यामूळे तो जीवोद्धारक अवतार होय. तद्वतच बळवडे भजनक्रीया घडऊन जीवोद्धरन करने, एवढेच नाही तर विरोधीमुक्ती(वैर केले असतांनाही मुक्ती देने) हा सुद्धा या अवताराचा वीषेश आहे. या अवताराच्या याच वीषेशामुळे श्रीकृष्णचक्रवर्तींनी गोकुळस्थांचे दही-दूध चोरीने भक्षण केले व भजनक्रीया घडऊन उद्धरन केले. तर पूतणा, शीशुपाळ, त्रुणाव्रत, केशीया, इत्यादींचे विरोधीमुक्ती या वीषेशाने उद्धरन केले. श्रीकृष्णचक्रवर्तींनी राजधर्म अंगीकारलेला असल्यामुळे व भुभारहरणार्थ संहार करन्याची आज्ञा अर्जुनास करुन व त्यास निमीत्त करुन संपूर्ण मानवजातीस भग्वद्गीतेसारखे अपूर्व मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

श्रीकृष्ण अवताराचा आनखी मोठा वीषेश म्हणजे अष्टवीधब्रम्हचर्याचा. श्रीचक्रधरस्वामींच्या उक्तीप्रमाणे 'बाईः श्रीकृष्णी अष्टवीधब्रम्हचर्य'. महानुभाव पंथियांचे हे मत सुद्धा श्रीकृष्ण अवताराबाबतच्या इतर पूराणमतापेक्षा भिन्न आहे.

अश्या या श्रीकृष्णचक्रवर्तींच्या अपूर्व अवताराचे भरभरून गूणवीषेश महानुभाव पंथिय वाङ्मयात वीषेशत्वाने आढळुन येते.

About Mahanubhav Panth in Marathi

महानुभाव पंथ विषयी 
इ.स.१२०० च्या सूमारास महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय उदयास आला. महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावःया दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. या संप्रदायाची संस्थापना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी केलेली असली तरी, मूळात त्यांनी या पंथास स्वतः कोणतेही नांव दीलेले नव्हते. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या उत्तरापंथे गमना नंतर, जेव्हा पंथाची धुरा नागदेव आचार्यांच्या खांद्यावर आली, त्याकाळी या पंथास भटमार्गअसे संबोधल्या जाऊ लागले. महानुभाव पंथया नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची महात्मा पंथ”,”अच्युत पंथ”,”जयकृष्णी पंथ”,”परमार्गअशी अन्य नावेही पूढील काळात उदयास आली. काही भागात अच्युतपंथउत्तर भारतात जयकृष्णीपंथही नावे याच पंथाची आहेत. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने मराठीतून सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. संप्रदाय प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी विषद केलेल्या तत्त्वज्ञानाचा थोडक्यात गोषवारा असा -- द्वारकाधीश श्रीकृष्ण, सैंह्याद्रीचे श्रीदत्तात्रेय, द्वारावतीचे श्रीचांगदेवराऊळ, ऋद्धिपूरचे श्रीगोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे श्रीचक्रधर असे पाच जीवोद्धारक अवतार आहेत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि मूळ चार तत्त्वे(पदार्थ) आहेत. देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत,परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहेअसे या तत्त्वज्ञानाचे मुळ सूत्र आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराथी भाषीक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आद्यआचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून (नको गा केशवदेया:येणें,माझिया म्हातारिया नागवतील:ः किंवा तुमचा अस्मात् मी नेणे गा:मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मर्हाटी:तियाचि पुसा: स्मृ.स्थ.) असे बोलुन त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेउन मराठीचा मान कायम ठेवला. श्रीचक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत शिकलेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृतप्रचुर वाङ्मयाच्या वळणावर झाली व संस्कृत भाषेवर त्यांच्या मोठा ताबा असल्याने या सर्वच ग्रंथरचना अत्यंत प्रभावशाली झाल्या आहेत. या ग्रंथ निर्मीती काळात प्रारंभी भाष्य व महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. व पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या,धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. पंडित आनेराजांच्या लक्षणरत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ व सातकाव्यांच्या साती ग्रंथावरील टीपा यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, सूत्रलक्षणेअर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र, यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१)चरित्रग्रंथ, (२)सूत्रग्रंथ, (३)काव्यग्रंथ, (४)भाष्य व महाभाष्यग्रंथ, (५)साधनग्रंथ, (६)तात्त्विकग्रंथ, (७)गीता टीका,(८)आख्यानक काव्ये, (९)स्थलवर्णनपरग्रंथ, (१०)इतिहासग्रंथ, (११)स्फुटरचना (१२)निरुक्त (१३)महानिरुक्त (१४)आरत्या (१५)स्तोत्रे (१६)संदर्भग्रंथ अशा व इत्यादी विविध प्रकारांत करता येईल. भाष्करभट बोरीकर हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना,लीळाचरित्र, द्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या त्या भागात चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर पं.हिराइसापं.धानाइसा, पं.पोमाइसा, पं.नागाइसा, पं.अनंतदेव आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या वासनाही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. या चोरी प्रकारानंतर मात्र काही आन्मायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ लिपीबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, आपली धर्ममते कालौघात भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे मुळ व पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यात येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक ४५चे वर लिप्या तयार झाल्या त्यामुळे पंथिय बहुतेक ग्रंथ यां सांकेतिक लिपीतच आढळतात. 
इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक व बाराव्या शतकातील महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. अश्या या प्रवाहविरुद्ध विचारधारेमुळे श्रीचक्रधरस्वामींना महदाश्रम, ब्रम्हसानासारख्या राजाश्रीत धर्ममार्तंडांनी कडतरुन विरोध केला. व याचे पर्यावसान कट कारस्थानांत झाले. स्वामी स्वतः अहींसेचे पूरस्कर्ते असल्याने या विरोधकांचा स्वामींनी कींचीतही विरोध केला नाही. याऊलट महाराष्ट्राचा त्याग करण्याचा त्यांनी नीर्णय घेतला, व अल्पकाळातच महाराष्ट्राला आपल्या प्रज्वल वीचारधारेपासून पोरके करुण स्वामी उत्तरेकडे निघुन गेले. जो त्रास श्रीचक्रधरस्वामींच्या आधुनिक व ज्वलंत विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजे श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणार्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे.

Wednesday, 24 January 2018

Panch Avatar Mantra


श्री कृष्ण देव नमो नमः
वासुदेव जय नमो नमः
कुंजबिहारी नमो नमः
यशोदा नंदन नमो नमः
 
श्री दत्त प्रभु नमो नमः
हे जग पालक नमो नमः
अनुसया सुत नमो नमः
अत्रि नंदना नमो नमः
 
श्री चक्रपाणी नमो नमः
जनक नंदना नमो नमः
द्वारावतीकारा नमो नमः 
जनकाईसा सुत नमो नमः 
 
श्री गोविंद प्रभु नमो नमः 
निर्गुण ब्रम्हा नमो नमः 

चक्रधरा जय नमो नमः 
माल्हिनी सुत जय नमो नमः  

About Mahanubhav Panth in English

      Mahanubhav Pantha (Jai Krishni Sampraday) is one of the ancient Pantha. It is the Sampraday that pramotes "Sarva Dharma Samabhav". Mahanubhav Pantha was founded by Bhagwan Shri Chakradhar Swami in 12th Century. Mahanubhav Pantha worships 5 avatars of Lord, those are Bhagwan Shri KRISHNA, Shri DATTATREYA PRABHU,Shri CHAKRAPANI MAHARAJ, Shri GOVIND PRABHU & SARVADHNYA Shri CHAKRADHAR Swami which are known as PANCHA KRISHNAs.
        Pantha means the path or the way. The Mahanubhav Pantha leads you the way which guides you to live a meaningful life with the grace of God. 
        The places visited by Bhagwan Shri Chakradhar Swami during his travel for propagation of the Pantha are known as the 'Teertha Stan' (holy places), and the place where Shri Chakradhar Swami 'Stayed / Took Rest or Sleep' are know as the 'Charanankit Sthan'(चरणांकित स्थान) - 'The Lords Feet Touched Place'.
              Mahanubhav pantha has accepted and propagated the very advanced, realistic and practical Principles and Tatawas from the ancient time. The followers of Mahanubhav Pantha are expected to follow the principles of the Pantha. The principles of mahanubhav pantha are very simple and are easy to follow in today’s modern and fast life style. Mahanubhavi's believe and exclusively worships only One Permeshwar. The murti pooja (Idol worshiping) is not followed by the pantha and Mahanubhavis worship places (चरणांकितस्थान) and stones (विशेष) touched by Chakradharswami. Mahanubhava believe and respect the animal life and are strictly follower of vegetarian (शाकाहार) and non-violent (अहिंसा) life style.

Friday, 19 January 2018

Details of Mahanubhav Panth Big Events

महानुभाव पंथ घटना आणि नोंदी

घटना

हरिपाळाचा जन्म
इ.स.1195
हरिपाळाचा मृत्यू
इ.स.1220
हरिपाळाचे देह स्विकारले
इ.स.1220
स्वामी भडोचला 12 वषेॅ व 6 महिने होते
इ.स.1220-1232
रूध्दपुरला येऊन शक्ती स्वीकार
इ.स.1233
सालबडीॅ
इ.स.1233-1245
काटोल, ओरंगल
इ.स.1245-1249
सेंदुजॅन ,लोणार
इ.स.1249-1261
कृष्णदेवराजाची महादेवराजासह भेट
इ.स.1259
गोंडवाडा ,भोगराम ,भंडारा
इ.स.1261 -1264
(स्वामीचा 1233ते1264 पयॅतचा म्हणजे 31 वषाॅचा काळ एकांकाचा झाला )
पैठणला बाईसा प्रेमदान
इ.स.1264
पुवाॅधॅ -4 वषेॅ
1264-1268
आचायाॅचे अनुसरण
इ.स.1268
उतराधॅ - 4 वषेॅ
इ.स.1269-1272
उतरापंथी गमन
फेबु .महिना 1272
लिळा चरित्राचे लेखन
इ.स.1275
वच्छाहरण
इ.स.1278
धवळे(महदंबा)
इ.स.1278-1280

दंडवत प्रणाम

Friday, 12 January 2018

महानुभाव के चार पदार्थ

*जय श्री चक्रधर*

*जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चार पदार्थांचे कारण,स्वरुप, लक्षण, कार्य*

🔴 *जीव:-*

▶कारण- जीवाचे कारण चैतन्य मायेच्या अव्यक्त स्वरूपातील तम नावाच्या विभागात अविध्या युक्त भ्रांत आहेत...
▶स्वरुप-  अविद्या युक्त केवळ
▶लक्षण- जीव अधमती, अधगति, अधरती अशा अवलक्षणानी युक्त आहेत
▶कार्य- संत(पूण्य)असंत(पाप) कर्मे करने

🔴 *देवता:-*

▶कारण- देवता कारण अव्यक्त आहे.
▶स्वरुप- ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य अशा सामर्थ्याने युक्त आहे आणि त्रिगुनात्मक आहे, मात्र ईश्वर आणि जीव स्वरूपासारखे केवळ नाही
▶ लक्षण- देवतांचे लक्षण निर्दयी आहे, जीवाना दुःख भोगविताना दया येत नाही
▶ कार्य- देवतांचे कार्य श्रुष्टि रचने काळी ईश्वराच्या मनोधर्माने, चैतन्य मायेच्या आदेशाने कार्याला लागने, मायेच्या आदेशाने जीवानी धारण केलेल्या जड़ प्रपंचाला सामर्थ्य देण्यासाठी आपले पंच प्रकारी सामर्थ्य अंश रूपाने देहाच्या प्रत्यक अवयवात स्थापित करने , जीवांणा सुख-दुःख भोगवने

🔴 *प्रपंच:-*

▶कारण- प्रपंचाचे कारण अष्टभैरव स्वरूपाच्या आधारे आहे
▶स्वरुप- जड़ मूढ़ आहे
▶लक्षण- जीवाणा आकर्षित करने
▶कार्य- श्रुष्टि रचने काळी व्यक्त होने आणि श्रुष्टि संहारी नष्ट होउंन अष्टभैरवाच्या कारण स्वरूपी सामावने.

🔴 *परमेश्वर:-*
▶कारण- परमेश्वराचे कारण अव्यक्त असून अगाध, अंनत अचिंत्य सर्व शक्तिमान आहे.
▶स्वरुप- ईश्वराचे स्वरुप ज्ञान, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश तसेच केवळ बुद्धमय आणि फ़क्त आंनदमय आहे.
▶लक्षण- दया, मया, कृपा, करुणा अशा गुण लक्षणानि समृद्ध आहे
▶कार्य- परमेश्वराचे कार्य जीवाणा अविद्याबंधातून मुक्त करण्यासाठी चैतन्य माये करवी श्रुष्टिची निर्मिति करवुन जीवाणा मनुष्य जन्माला आनने आणि जीवांचा दुःखदायी संसार बंधनातून उद्धार करने.

*सृष्टि निर्मितीची मुलतत्व असलेल्या अनादिचे चार पदार्थ असलेल्या जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर यांचे कारण स्वरुप कार्य लक्षण समजले तरच ब्रम्हविद्या समजू शकते!*🙏🏼


वरील लेख हा चारही पद्धर्थाचे यथार्थ  बोध होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे व तो आपण कायमस्वरूपी जतन करून ठेवावे व पाठ करावेे. जर समजले नाही तर आपल्या जवळच्या जाणकार व्यक्तीला विचारून घ्यावे व वारंवार आठवावे.

*अनादिचे चार पदार्थ हे ब्रह्मविद्येचे आधारस्तंभ आहेत यांच्यावरच खरी मार्गाची इमारत उभी आहे. खरे म्हणजे हे चार पदार्थाचीच यथार्थ (जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, कारण,स्वरूप, लक्षण,कार्य) बोध,जाणीव करून देण्यासाठीच परमेश्वर भूतलावर अवतार धारण करतात.*
   
🙏दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🙏

About Mahanubhav Panth in Marathi

महानुभाव पंथ पंचकृष्ण परमेश्वर अवतार

महानुभाव पंथ

महानुभाव पंथ हा एक हिंदुधार्मांतर्गत पंथ आहे. परंतु सत्य, अहिंसा, समतावादी असून ज्ञान, भक्ती, वैराग्य, या तीन्हींनी युक्त, एकनिष्ठ भक्ती करणारा, भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु, श्रीचक्रपाणीप्रभु, श्रीगोविंदप्रभु, सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी हे परमेश्वराचे अवतार मानणारा ज्ञानमार्ग आहे. कलियुगात पूर्णब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात ज्ञानमार्गाची महाराष्ट्रात स्थापना केली तेव्हा पासून आजपर्यंत हा पंथ आपल्या तत्त्वप्रणालीनुसार चालत आहे. पंथाचे मूळ जरी महाराष्ट्रात असले तरी पंथाचा प्रसार संपूर्ण देशभर झालेला आहे. अगदी काबुल-कंदाहार पर्यंत हा पूर्णपणे व्दैतवादी पंथ असून जीव, देवता व प्रपंच (जगत) यापासून पूर्णपणे स्वतंत्र असणारा एक नित्यमुक्त परमेश्वराच मोक्ष (मुक्ती) देण्यास समर्थ आहे. हा सिद्धांत या तत्वज्ञानाचा पाया असल्यामुळे त्या परमेश्वराची भक्ती करून त्याचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळविणे हे जीवाचे एकमेव साध्य आहे.

पंच अवतार माहिती- १) भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती- द्वापार युगात मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत क्षत्रिय वर्णातील यादव कुळात वसुदेव – देवकीच्या पोटी श्रावण वद्य अष्टमीला रात्री १२ वा. अवतार घेतला. बालपणी गोकुळ-वृंदावनात खेळ करत दैत्यांना ठार केले व मथुरेत कंसाचा  वध करून वसुदेव-देवकीला बंदिशाळेतून मुक्त केले. अर्जुनाला युद्धभूमीवर श्रीमद्भगवद्गीता सांगितली. उद्धव, कुंती, द्रौपदी, पांडव इत्यादी भक्तांचे रक्षण करून मोक्ष दिला. प्रमुख तीर्थस्थाने:- मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन.

२) श्रीदत्तात्रेय प्रभू- त्रेतयुगात हिमालयातील बद्रिकाश्रामामध्ये ऋषीकुलात अत्रि-अनसुयेच्या पोटी मार्गशीष शुद्ध चतुर्थीला प्रातःकाळी ४ वा. अवतार घेतला. यदुराजा, अलर्कारजा, राणी मदालसा आदी भक्तांना ज्ञान प्रेम देऊन मुक्ती दिली. श्रीदत्तात्रेय प्रभू  अजूनपर्यंत विद्यमान आहेत. त्यांचे दर्शन अमोघ असल्यामुळे दर्शन सर्वांना होत नाही. प्रमुख तिर्थस्थाने :- बद्रिकाश्रम, पांचाळेश्वर, माहूर.

३) श्रीचक्रपाणी प्रभू- कलीयुगात फलटण ( जि. सातारा ) येथे ब्राह्मण वर्णातील कराड शाखेत जनकनायक-जनकाईसाच्या पोटी अश्विन वद्य नवमीला ( शके १०४२ , इ.स. ११२०) सकाळी ९ वा. अवतार घेतला. अनेक दु:खी जीवांचे दु:ख दूर करून सुख दिले. उधळीनाथ इत्यादी ५२ पुरुषांना देवतेच्या विद्यांचे दातृत्व केले. प्रमुख तीर्थस्थाने : फलटण, माहूर, द्वारका.

४) श्रीगोविंद प्रभू- कलीयुगात काटसूरला ( जि. अमरावती) काण्वशाखेत अनंतनायक-नेमाइसाच्या पोटी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला ( शके ११०९, इ.स. ११२० ) रात्री १० वा. अवतार घेतला. ऋद्धपुरला वास्तव्य करून दु:खितांचे दु:ख दूर करता-करता ते संपूर्ण विदर्भाचे ‘राऊळ माय-राऊळ बाप’ झाले. आबाईसा, म्हाइंभट्ट, लक्ष्मीन्द्रभट्ट, कोथळोबा, इत्यादी भक्त त्यांची सेवा करायचे. प्रमुख तीर्थस्थाने:–  ऋद्धपूर आणि परिसर.

५) सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी- कलीयुगात भडोचला ( गुजरात ) लाडसामक शाखेत प्रधान विशालदेव-माल्हणीदेवी हे माता-पिता. भाद्रपद शुद्ध द्वीतीयेला ( शके ११४२, इ स. १२२०) दुपारी १२ वा. अवतार घेतला. राज वैभव सोडून ऋद्धपुरला श्री गोविंदप्रभूपासून परावर शक्ती स्वीकार करून महाराष्ट्रभर पायी परिभ्रमण केले. नागदेवाचार्य, पंडित म्हाइंभट्ट, नागुबाईसा, नाथोबा, नीळभट्ट इत्यादी जीवांना ज्ञान-प्रेमाचे दातृत्त्व करून मुक्ती दिली. समाजातील विषमता  दूर करून स्त्री शूद्रांना समान अधिकार देऊन दु:खीतांचे दु:ख हरण केले. प्रमुख तीर्थस्थाने :- पैठण, डोमेग्राम, सिन्नर, बेलापूर, वेरूळ, सावखेडा(खडकुली) जाळीचादेव.



प्रमुख ग्रंथ कर्ते- १) आचार्य श्री नागदेव- महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी उत्तरदिशेला प्रयाण केल्यानंतर आचार्यपदाची धुरा त्यांनी समर्थपणे संभाळली. त्यांच्या जवळ सातशे ते आठशे शिष्य राहत असत, त्याकाळी त्यांची ‘वेधवंती नागदेव’ म्हणून प्रसिद्धी होती. अनेक ग्रंथ त्यांच्या देखरेखी खाली रचले गेले. २) पंडित म्हाइंभट्ट- षड्शास्त्र संपन्न, संस्कृत विद्वान ब्राह्मण, घरी गर्भश्रीमंती होती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वानांना वाद-विवादात पराजित केले होते. श्रीचक्रधरस्वामींपासून परमेश्वर ज्ञानाचा संचार झाल्यावर ते श्रीगोविंदप्रभुंजवळ अनुसरले, त्यांनी मराठी साहित्याला अनमोल देणगी आद्यचरित्र्यग्रंथ ‘लीळाचरित्राच्या’ रूपाने दिली नंतर श्रीगोविंदप्रभू चरित्र लिहिले. बरेचसे स्फुटकाव्ये निर्माण केली.३) केशीराजव्यास- संस्कृत भाषेवर हातखंडा. नागदेवआचार्यांची भेट झाली व संन्यास घेतलानंतर ‘लीळाचरीत्रा’तून श्रीचक्रधरस्वामींनी निरुपण केलेली सूत्रे संकलित करून ‘सुत्रपाठ’ ग्रंथ, दृष्टांतावर दृष्टांतीक, काल्पनिक, मुर्तीप्रकाश, अवस्थाभूतगीत इत्यादी मराठी रचना व रत्नमालास्तोत्र, दृष्टांतस्तोत्र, ज्ञानकलानिधीस्तोत्र, इत्यादी  संस्कृत रचना त्यांनी केली. ४) कविश्वरव्यास (भास्करभट्ट बोरीकर)- अत्यंत रसाळ आणि मंत्रमुग्ध प्रवचनासाठी ते प्रसिद्ध होते. संस्कृत रचना एकदम झटपट करत असत. जसे आकाशात लिंबू फेकून ते खाली येईपर्यंत नवीन श्लोक तयार करायचे. त्यांनी शिशुपालवध व उद्धवगीता हे काव्यग्रंथ व नरविलापस्तोत्र, संस्कृत पूजावसर, मुर्तीवर्णनस्तोत्र, श्रीयाष्टक, विरहाष्टक, मराठी पुजावसर, चालिसाख्यस्तोत्र इ. रचना त्यांनी केल्या. ५)महादाईसा- रूपाईसा हे मूळ नाव. श्रीचक्रधरस्वामींच्या सहवासात असताना सतत प्रश्न विचारत असत म्हणून स्वामींनी तिची प्रशंसा करताना म्हणाले की ‘ही चर्चक, जिज्ञासक आहे’ आद्य मराठी स्त्री कवयित्रीचा मान हा महादाईसाकडे जातो. तिने ‘धवळे’ नावचे श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहवर्णनपर रचना केली. ६) पंडितबास- एक भावनिक कवी, गीतकार, श्रीनागदेव आचार्यांनी प्रथम गीत गाण्याला प्रतिबंध केला. परंतु त्यांची आर्तता, करूणा ऐकून त्यांना गाण्याला अनुज्ञा दिली. त्यांनी ‘वच्छाहरण’ हा काव्य ग्रंथ व धुवे, चौपद्या आरती इत्यादींची रचना केली. ७) परशरामबास, मुरारीमल्लबास, गुर्जरशिवव्यास इत्यादी अनेक ग्रंथ कर्ते आहेत.

पंथाची नावे- १) भट्टमार्ग, २) परमार्ग, ३) महानुभाव पंथ,  ४) जयकृष्णी पंथ

साहित्य–चरित्रग्रंथ

ग्रंथ लेखक सन१) लीळाचरित्र (श्रीचक्रधरस्वामी चरित्र)पं. म्हाइंभट्ट शके १२०४ इ.स. १२८२२) श्रीगोविंदप्रभू चरित्रपं. म्हाइंभट्ट शके १२१० इ.स. १२८८३) स्मृतीस्थळनरेंद्रबास शके १२३५ इ.स. १३१३४) धवळे (काव्य)महदंबा ( महादाईसा ) शके १२०८ इ.स. १२८६

तत्वज्ञानपर मुख्यग्रंथ – १) श्रीमद्भगवद्गीता-    श्रीकृष्ण निरोपित २) सुत्रपाठ -पं. केशीराजव्यास शके १२१२ -१३ इ.स. २९०-९१. ३) स्थळपोथी, महाभाष्य, बंद.

सप्तकाव्य ग्रंथ

ग्रंथकर्तेलेखनकाळ-शके  इ.स.ओवीसंख्या१) रुक्मिणी स्वयंवरनरेंद्रबास१२१५१२९३१८८५२) शिशुपालवधभास्करभट्ट बोरीकर१२३४१३१२१०८७३) उद्धवगीताभास्करभट्ट बोरीकर१२३५१३१३८२७४) वच्छाहरणपंडितबास१२३८१३१६५०३५)सह्याद्रीवर्णनरवळोव्यास१२७५१३५३५१७६) ज्ञानबोधविश्वनाथबास बाळापुरकर१३४०१४१८१२००७) ऋद्धपूर वर्णननारायणव्यास बहाळीये१३४०१४१८६४१

Mahanubhav Panth Types of prasad


|| श्री कृष्ण प्रभु समर्थ ||

🌸प्रसादांचे प्रकार 🌸

भुतोना भविष्याते आसा अनमोल ठेवा. 

पाच अवतारांपैकी
 श्री गोविंद प्रभू 
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 
या दोन अवतारांच्या प्रसादरूप वस्तू प्रसादामध्ये आलेल्या आहेत 
त्या प्रसादांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
 
(अ) मूर्ती निष्ठ प्रसाद

 (ब) विशेष संबंधाचे प्रसाद मुर्तीनिष्ठ प्रसाद मध्ये
१,नख 
२,दाढ 
३,केशकलाप 
४,अनुलेपन
या चार वस्तूंचा समावेश होता.

 विशेष संबंधाच्या प्रसादामध्ये
१ कापूस 
२ कोसला 
३ रोम 
४ चर्म 
५ धातू 
६ दात 
७ काष्ट 
८ पाषाण
या आठ प्रमुख वस्तूंचा समावेश होता
 आता या आठ प्रमुख वस्तुंमध्ये प्रमुख्याने ज्या ज्या वस्तूंचा समावेश होता ते आपण पाहू या.

 कापूस 
या प्रकारात सुती वस्रांचा समावेश होता. ती वस्त्रे
१ आंगी 
२ टोपरे 
३ बहिर्वास 
४ फुटा 
५ पडदनी 
६ पासवडी 
७ पासोडा 
८ औदास्याची दुटी 
९ परसनायकाची दुटी 
१० गदोनायकांच्या पत्नींने दिलेले वस्त्र
 ११ दोन करड्या रंगाचे खळीचे वस्त्र
 १२ गो गो नावाच्या भक्ताने दिलेले वस्त्र 
१३ कु-र्हा येथील मातंगाने श्री प्रभूंना दिलेले त्रिवडी वस्त्र
१४ द्रविड देशातल्या ब्राह्मणाने
श्री प्रभूंना दिलेले वस्त्र
१५ जोगनायकाचे वस्त्र
१६ उत्तरी 
१७ जानवे 
१८ पविते 
१९ जुना पाट 
२१ गादीतील कापूस. 

कोसला 
या प्रकारात रेशमी वस्ञांचा समावेश होताे. तोपुढील प्रमाणे आहेत 
१बारावानाची दुटी 
२ म्हाइंभटांनी श्री प्रभूंना अर्पण केलेली मेघवर्णी दुटी 
३ मेघवर्णी पागोटे 
४ सर्वज्ञानी मालगंठीच्याप्रसंगी नेसलेला सोनेसळा फुटा (उपरणे) 
५ क्षीरोदक फुटा 
६ सारनेरा फुटा 
७ म्हाळाइसाने अर्पण केलेल्या वस्त्राची किनार, ती रेशमी होती 
८ गरूडनीळ दुटी. 

रोम
या प्रकारात प्राण्यंच्या केसांपासून तयार केलेल्या वस्ञांचा समावेश होतो ती पुढील प्रमाणे आहेत.
१ पंचरंगी घोंगडे 
२ सौराष्ट्र प्रांतातून आणलेले घोंगडे 
३ चवरी 
४ साधें घोंगडे 
५ सकलादेची टोपी

चर्म 
या प्रकारात चामड्यांच्या वस्तूंचा समावेश होतो. तो पुढील प्रमाणे.
१ श्री चरणाखाली ठेवण्याची गादी 
२ पाटावर ठेवण्याची गादी 
३ वोसाडी 
४ पालखी वर घालण्याचे आच्छादन 
५ पखाल 
६ पोहरा 
७ काको नावाच्या भक्तांचा करवता 
८ सागळ 
९ उपाण्हो

धातु 
या प्रकारात सोने, चांदी, तांबे, लोखंड याच्या वस्तूंचा समावेश होतो. तो पुढील प्रमाणे 
१वांकी 
२ सांखळे
 ३ कांबी 
४ पालांडे 
५ आरतीचे 
६तबक 
७ थाळा
 ८ताट 
९ वाटे 
१० आरसा
 ११ आडकीता
१२ गंगांळे 
१३ ताम्हण 
१४ दोन तांब्याचे कळस
 १५ अचलपूर येथील अंबीनाथ लिंगावरील तांब्याचा पत्रा

१६ चौरंगाचे लोह 
१७ राजमठाच्या कवाडाचे लोह १८ काकोच्या करवत्याचे लोह १९  महाद्वाराच्या कवाडाचे लोह 
२०  केशवनायकांच्या पाणपोई च्या तोटीचे लोह 
२१ तसेच कवाडाचे लोह

 दात 
या प्रकारात हस्तीदंतापासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश होतो. 
१ कापुराची सेंद(डब्बी)
२ फणी 

काष्ट 
या प्रकारात लाकडां पासुन तयार केलेल्या वस्तूंचा समावेश होता तो पुढील प्रमाणे

१आऊसाचे पात्र
२ डोमेग्रामच्या राजमठाचा खांब 
३ उंबरवट 
४ नवा माचा 
५ जुनामाचा 
६ माचोळी 
७ पाट 
८चौरंग ९ महाद्वाराचा दरवाजा 
१० डोमेग्राम व रिध्दपूर येथील राजमठाचा दरवाजा
११ भानवसाचे कवाड 
१२ ञिपुरुषाच्या मठाचे कवाड 
१३ केशवनायकांच्या माळवधाचेकवाड 
१४ शाळेचे कवाड 
१५ बारव केशवीचे कवाड 
१६ नेउरगावचे बाळाने 
१७ फणी 
१८ डोमेग्राम चे दोन्ही यमळार्जुन.

 पाषाण 

या प्रकारात काळ्या दगडाचा समावेश होता.
१ मोत्याचा टीळा याचा समावेश पाषाण या जातीत केलेला आहे 
२ सिंहनस्तळी 
३ महाद्वाराचा उंबरवट 
४ सोपान पायरी 
५ सोपान भिंत 
६ भांडेभेदन 
७ राजमठाचा उंबरवट 
८ रिध्दपूर येथील राजमठातील आरोगणा स्थानीचा खांब 
९ रिध्दपूरचे बारा घोडे 
१० गुढा 
११ खडकुलीचे खडक 
१२ विचार चिरा 
१३ उखळ. 

कर्दम प्रसाद 

जळालेल्या वस्ञ प्रसादांच्या राखेचे पुठ्ठयावर लेप देऊन जे प्रसाद तयार केल जातात त्यास कर्दम प्रसाद असे म्हणतात 
हा प्रकार नंतर च्या काळात अस्तितवात आलेला आहे काही विद्वतरत्नानी तयार करून ठेवली ती तशीच तुमच्या पर्यन्त आणली आहे.

   
💐🌹कृपा सर्वज्ञांची ग्रुप🌹💐
          🙏दंडवत प्रणाम 🙏

Saturday, 6 January 2018