Thursday, 25 January 2018

About Shri krishna in Marathi

श्रीकृष्णचक्रवर्ती महाराज - "कृष्ण" या शब्दातील 'कृष्' या धातूचा अर्थ वीषद करताना अन्वयकार आपल्या 'नामाचे दहा ठाये' या प्रकरणात म्हणतात 'कृष् हा धातू विलेखनी वर्तेः कर्मराहाटीते व्यावर्तीः ते विलेखनःः कर्मराहाटीते व्यावर्तोणिः दुखसाधनालागी जनातें व्यवहारापासौनि आकर्षीः म्हणिजे ओढुनी काढीः तो कृष्णःः तोची प्रतीयुगी पंचकृष्णःः म्हणुनच पांचही अवतारांना पंचकृष्ण म्हणुन संबोधण्यात येते.
​
महानुभावपंथात श्रीकृष्णचक्रवर्तींचा अवतार हा द्वापार युगात पीता वसुदेवापासून माता देवकी यांच्या गर्भी जन्मलेला गर्भीचा अवतार होय. पौराणीक कल्पनेप्रमाणे किंवा इतर सांप्रदायांच्या मताप्रमाणे महानुभाव पंथियांना श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार म्हणुन मान्य नसून, ते त्याला परब्रम्ह परमेश्वरावतार व संपूर्ण उभयदृश्यावतार माणतात. तद्वतच महानुभाव श्रीकृष्ण अवतारास चतुर्भुज न माणता, 'मनुष्यवेषधारी होती' या श्रीचक्रधरस्वामींच्या उक्तीप्रमाणे द्विभूजच माणतात. ही दोन्ही मते महानुभाव पंथियांची श्रीकृष्ण अवताराबाबतची मोठी मत भिन्नता स्पष्ट करतात.
​
महानुभावीय मताप्रमाणे श्रीकृष्णचक्रवर्तींचा अवतार हा उभयदृश्यावतार असल्यामूळे तो जीवोद्धारक अवतार होय. तद्वतच बळवडे भजनक्रीया घडऊन जीवोद्धरन करने, एवढेच नाही तर विरोधीमुक्ती(वैर केले असतांनाही मुक्ती देने) हा सुद्धा या अवताराचा वीषेश आहे. या अवताराच्या याच वीषेशामुळे श्रीकृष्णचक्रवर्तींनी गोकुळस्थांचे दही-दूध चोरीने भक्षण केले व भजनक्रीया घडऊन उद्धरन केले. तर पूतणा, शीशुपाळ, त्रुणाव्रत, केशीया, इत्यादींचे विरोधीमुक्ती या वीषेशाने उद्धरन केले. श्रीकृष्णचक्रवर्तींनी राजधर्म अंगीकारलेला असल्यामुळे व भुभारहरणार्थ संहार करन्याची आज्ञा अर्जुनास करुन व त्यास निमीत्त करुन संपूर्ण मानवजातीस भग्वद्गीतेसारखे अपूर्व मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.

श्रीकृष्ण अवताराचा आनखी मोठा वीषेश म्हणजे अष्टवीधब्रम्हचर्याचा. श्रीचक्रधरस्वामींच्या उक्तीप्रमाणे 'बाईः श्रीकृष्णी अष्टवीधब्रम्हचर्य'. महानुभाव पंथियांचे हे मत सुद्धा श्रीकृष्ण अवताराबाबतच्या इतर पूराणमतापेक्षा भिन्न आहे.

अश्या या श्रीकृष्णचक्रवर्तींच्या अपूर्व अवताराचे भरभरून गूणवीषेश महानुभाव पंथिय वाङ्मयात वीषेशत्वाने आढळुन येते.

About Mahanubhav Panth in Marathi

महानुभाव पंथ विषयी 
इ.स.१२०० च्या सूमारास महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय उदयास आला. “महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः” या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. या संप्रदायाची संस्थापना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी केलेली असली तरी, मूळात त्यांनी या पंथास स्वतः कोणतेही नांव दीलेले नव्हते. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या उत्तरापंथे गमना नंतर, जेव्हा पंथाची धुरा नागदेव आचार्यांच्या खांद्यावर आली, त्याकाळी या पंथास “भटमार्ग” असे संबोधल्या जाऊ लागले. “महानुभाव पंथ” या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची “महात्मा पंथ”,”अच्युत पंथ”,”जयकृष्णी पंथ”,”परमार्ग” अशी अन्य नावेही पूढील काळात उदयास आली. काही भागात “अच्युतपंथ” उत्तर भारतात “जयकृष्णीपंथ” ही नावे याच पंथाची आहेत. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररुपाने मराठीतून सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. संप्रदाय प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी विषद केलेल्या तत्त्वज्ञानाचा थोडक्यात गोषवारा असा -- द्वारकाधीश श्रीकृष्ण, सैंह्याद्रीचे श्रीदत्तात्रेय, द्वारावतीचे श्रीचांगदेवराऊळ, ऋद्धिपूरचे श्रीगोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे श्रीचक्रधर असे पाच जीवोद्धारक अवतार आहेत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि मूळ चार तत्त्वे(पदार्थ) आहेत. “देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत,परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे” असे या तत्त्वज्ञानाचे मुळ सूत्र आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराथी भाषीक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आद्यआचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून (नको गा केशवदेया:येणें,माझिया म्हातारिया नागवतील:ः किंवा “तुमचा अस्मात् मी नेणे गा:मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मर्हाटी:तियाचि पुसा: स्मृ.स्थ.) असे बोलुन त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेउन मराठीचा मान कायम ठेवला. श्रीचक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपारिक संस्कृत शिकलेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृतप्रचुर वाङ्मयाच्या वळणावर झाली व संस्कृत भाषेवर त्यांच्या मोठा ताबा असल्याने या सर्वच ग्रंथरचना अत्यंत प्रभावशाली झाल्या आहेत. या ग्रंथ निर्मीती काळात प्रारंभी भाष्य व महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. व पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या,धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. पंडित आनेराजांच्या लक्षणरत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ व सातकाव्यांच्या साती ग्रंथावरील टीपा यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, सूत्रलक्षणे, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र, यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१)चरित्रग्रंथ, (२)सूत्रग्रंथ, (३)काव्यग्रंथ, (४)भाष्य व महाभाष्यग्रंथ, (५)साधनग्रंथ, (६)तात्त्विकग्रंथ, (७)गीता टीका,(८)आख्यानक काव्ये, (९)स्थलवर्णनपरग्रंथ, (१०)इतिहासग्रंथ, (११)स्फुटरचना (१२)निरुक्त (१३)महानिरुक्त (१४)आरत्या (१५)स्तोत्रे (१६)संदर्भग्रंथ अशा व इत्यादी विविध प्रकारांत करता येईल. भाष्करभट बोरीकर हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना,लीळाचरित्र, द्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या त्या भागात चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर पं.हिराइसा, पं.धानाइसा, पं.पोमाइसा, पं.नागाइसा, पं.अनंतदेव आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या “वासना” ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. या चोरी प्रकारानंतर मात्र काही आन्मायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ लिपीबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, आपली धर्ममते कालौघात भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे मुळ व पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यात येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक ४५चे वर लिप्या तयार झाल्या त्यामुळे पंथिय बहुतेक ग्रंथ यां सांकेतिक लिपीतच आढळतात. 
इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक व बाराव्या शतकातील महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. अश्या या प्रवाहविरुद्ध विचारधारेमुळे श्रीचक्रधरस्वामींना महदाश्रम, ब्रम्हसानासारख्या राजाश्रीत धर्ममार्तंडांनी कडतरुन विरोध केला. व याचे पर्यावसान कट कारस्थानांत झाले. स्वामी स्वतः अहींसेचे पूरस्कर्ते असल्याने या विरोधकांचा स्वामींनी कींचीतही विरोध केला नाही. याऊलट महाराष्ट्राचा त्याग करण्याचा त्यांनी नीर्णय घेतला, व अल्पकाळातच महाराष्ट्राला आपल्या प्रज्वल वीचारधारेपासून पोरके करुण स्वामी उत्तरेकडे निघुन गेले. जो त्रास श्रीचक्रधरस्वामींच्या आधुनिक व ज्वलंत विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजे श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणार्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे.

Wednesday, 24 January 2018

Panch Avatar Mantra


श्री कृष्ण देव नमो नमः
वासुदेव जय नमो नमः
कुंजबिहारी नमो नमः
यशोदा नंदन नमो नमः
 
श्री दत्त प्रभु नमो नमः
हे जग पालक नमो नमः
अनुसया सुत नमो नमः
अत्रि नंदना नमो नमः
 
श्री चक्रपाणी नमो नमः
जनक नंदना नमो नमः
द्वारावतीकारा नमो नमः 
जनकाईसा सुत नमो नमः 
 
श्री गोविंद प्रभु नमो नमः 
निर्गुण ब्रम्हा नमो नमः 

चक्रधरा जय नमो नमः 
माल्हिनी सुत जय नमो नमः  

About Mahanubhav Panth in English

      Mahanubhav Pantha (Jai Krishni Sampraday) is one of the ancient Pantha. It is the Sampraday that pramotes "Sarva Dharma Samabhav". Mahanubhav Pantha was founded by Bhagwan Shri Chakradhar Swami in 12th Century. Mahanubhav Pantha worships 5 avatars of Lord, those are Bhagwan Shri KRISHNA, Shri DATTATREYA PRABHU,Shri CHAKRAPANI MAHARAJ, Shri GOVIND PRABHU & SARVADHNYA Shri CHAKRADHAR Swami which are known as PANCHA KRISHNAs.
        Pantha means the path or the way. The Mahanubhav Pantha leads you the way which guides you to live a meaningful life with the grace of God. 
        The places visited by Bhagwan Shri Chakradhar Swami during his travel for propagation of the Pantha are known as the 'Teertha Stan' (holy places), and the place where Shri Chakradhar Swami 'Stayed / Took Rest or Sleep' are know as the 'Charanankit Sthan'(चरणांकित स्थान) - 'The Lords Feet Touched Place'.
              Mahanubhav pantha has accepted and propagated the very advanced, realistic and practical Principles and Tatawas from the ancient time. The followers of Mahanubhav Pantha are expected to follow the principles of the Pantha. The principles of mahanubhav pantha are very simple and are easy to follow in today’s modern and fast life style. Mahanubhavi's believe and exclusively worships only One Permeshwar. The murti pooja (Idol worshiping) is not followed by the pantha and Mahanubhavis worship places (चरणांकितस्थान) and stones (विशेष) touched by Chakradharswami. Mahanubhava believe and respect the animal life and are strictly follower of vegetarian (शाकाहार) and non-violent (अहिंसा) life style.

Friday, 19 January 2018

Details of Mahanubhav Panth Big Events

महानुभाव पंथ घटना आणि नोंदी

घटना

हरिपाळाचा जन्म
इ.स.1195
हरिपाळाचा मृत्यू
इ.स.1220
हरिपाळाचे देह स्विकारले
इ.स.1220
स्वामी भडोचला 12 वषेॅ व 6 महिने होते
इ.स.1220-1232
रूध्दपुरला येऊन शक्ती स्वीकार
इ.स.1233
सालबडीॅ
इ.स.1233-1245
काटोल, ओरंगल
इ.स.1245-1249
सेंदुजॅन ,लोणार
इ.स.1249-1261
कृष्णदेवराजाची महादेवराजासह भेट
इ.स.1259
गोंडवाडा ,भोगराम ,भंडारा
इ.स.1261 -1264
(स्वामीचा 1233ते1264 पयॅतचा म्हणजे 31 वषाॅचा काळ एकांकाचा झाला )
पैठणला बाईसा प्रेमदान
इ.स.1264
पुवाॅधॅ -4 वषेॅ
1264-1268
आचायाॅचे अनुसरण
इ.स.1268
उतराधॅ - 4 वषेॅ
इ.स.1269-1272
उतरापंथी गमन
फेबु .महिना 1272
लिळा चरित्राचे लेखन
इ.स.1275
वच्छाहरण
इ.स.1278
धवळे(महदंबा)
इ.स.1278-1280

दंडवत प्रणाम