Thursday, 15 February 2018

भक्त के आठ प्रकार

*परमेश्वराचे आठ भक्त*

श्री. स्वामींच्या पूजा अवसराच्या वेळेसच प्रेमियाला प्रेमाचा संचार होत असतो. प्रत्यक्ष ईश्वरस्वरुपाचे दर्शन होते. ज्या भक्ताकडून पुरभजन घडले व अधिकारानुसार परमेश्वराचे सान्निधान, सेवा, भजन, दास्य घडत असून पुर्वजोडमध्ये प्रेमाचा घडलेला उपाय, त्यांनाच परमेश्वर प्रेमसंचार देतात. ते भक्त अतिशय भाग्यवान ठरतात. कारण " परमेश्वर भक्ताशी समोर देती ज्ञानियासी पाठीसी घालीती"

*१)* *पुरभजनिया भक्त* *:-*
उभयदृश्यावताराचे ठिकाणी भजन घडल्याने त्या भक्ताला प्रेम होते व तो भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. उदा : बाईसाला पूर्वी ईश्वरसेवा घडली होती. म्हणून ' घरी जाऊनी संबंध दिधला' व तिला प्रेम दिले.

२) *विषयप्रेमिया भक्त* *:-*
विषयप्रेम होण्यास आधी कोरावेध पाहिजे व ईश्वराचे ठिकाणी तसेच ज्ञानिया भक्ताचे ठिकाणी अत्यंत आवडी पाहिजे. विषयप्रेम होण्यास स्त्रीदेह ही पाहिजे. स्त्रीदेहीच विषयप्रेम होते. विषयप्रेमाची विशेषता ही आहे की, हे दुर्लभ आहे. सान्निधानी परमेश्वराचा वियोग सहन होत नाही. जर परमेश्वरानी वियोग दिला तर तो क्षणाचाही विलंब न करता देहाचा त्याग करतो. उदा. रुक्मिणी श्रीकृष्णाचे नांव एकताच तिला आवड उत्पन्न होऊन विरह सहन होत नव्हता. जर श्रीकृष्णाने तिला दर्शन दिले नसते तर तिने देह त्यागला असता.

*३) *आग्रहिया भक्त* *:-*
या भक्ताला परमेश्वराकारणे इतका आग्रह असतो त्या आग्रहास्तव प्रसन्न करून घेतो.
'एल्हो' ही आग्रह करून स्वीकारायला लावीत होती. परमेश्वरही जीवाला आग्रह करतात, " येथीची दशीच धरली पुरे" आग्रह करुन स्वीकारायला लावतात.

*४)* *तळमळिया भक्त* *:-*
परमेश्वराविषयी एवढी तळमळ असते की, तो केव्हा भेटेल, दिसेल, पाहील, अशी भावना होऊन तळमळ लागते. उदा. भट्टोबासांनी स्वामी जेव्हा सोडुन गेले होते तेव्हा आपला देह एवढा कृश करुन कशाचेही भान नसून बेशुद्ध अवस्था केली होती. " भक्त वियोगी नुरे" भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही.

*५)* *आत्महननिया भक्त* *:*परमेश्वराचा वियोग सहन होत नाही म्हणून आत्मघात करून देह त्यागतात.

*६)* *अवस्थाप्रगटिया भक्त*
या भक्ताला दहा अवस्था प्राप्त झाल्यावरच देहत्याग करतो. एवढी परमेश्वराचे ठिकाणी श्रद्धा असते. ' देव माझा मी देवाचा' ही भावना असते.

*७* *आइकत खेओजाय -*
हा भक्त उत्तम प्रेमिया असतो. तो समोर परमेश्वराची मुर्त नाही या शब्दाबरोबरच देहत्याग करतो. क्षणभरही राहु शकत नाही. उदा - महादेवब्राम्हणाने खोटी वार्ता एकताच देह त्यागला.

*८)* *उपाइया भक्त* *:-*
हा भक्त कनिष्ठ प्रकारचा असुन तो उपाय करुन देह त्यागतो.

No comments:

Post a Comment