Saturday, 30 June 2018

33rd Dharmsabha at Mandva, Gujarat

महानुभाव सेवा समिति युवा ग्रुप द्वारा आयोजित 33वी धर्म सभा श्री कृष्ण मंदिर मांडवा, गुजरात में दिनांक 30 जून 2018 को सम्पन्न हुई जिसमें नीचे बताये हुए मुद्दों पर माहिती दी गई ।
1. जाधववाड़ी मार्ग की विशेषता
2 श्री दत्तात्रेय प्रभुकी लीला
3) अपनी वाणी और वर्तन कैसा होना चाहिए व धर्म के नीतिनियमो का आचरण कैसे करना चाहिए 
4. बाराखंडी की माहिती
। दण्डवत प्रणाम ।






















Saturday, 16 June 2018

32th Dharmsabha at Sayali

महानुभाव सेवा समिति कि 32वी मीटिंग श्री कृष्ण मंदिर, सायली (DNH) में तारीख 16 जुन 2018 को शाम 5 बजे सफलता पूर्वक सम्पन्न हुई ! जिस की कुछ छाया चित्र । जय श्री कृष्ण














Saturday, 17 March 2018

31st Dharmsabha at Karchond, Kaparada, Valsad

31st meeting of mahanubhav Seva samity yuva group has been successfully completed at shri krishna gyan mandir Karchond, kaparada, valsad on 17/03/2018 under the presence of Group admin and members.












Thursday, 15 February 2018

Jalicha dev ki leela

*श्रीक्षेत्र जाळीचा देव*
" *जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते.*

श्रीक्षेत्र जाळीचा देव  - अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. *हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले.* *त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीथथक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले.* वाघोदा (जि. जळगाव) येथील भक्त (कै.) लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला व्हावा यासाठी सन १९३६मध्ये येथे आले. त्यांनी येथे एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवसी पहाटे तीनला एक साधू त्यांना स्वप्नात दिसले. व म्हणाले तू मला सावली कर, मी तुझा रोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडुपे काढून १९३८मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या बादशाहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते. तेव्हा (कै.) श्री. पाटील व तेथील पुजारी (कै.) दत्तूबुवा हैदराबादला जाऊन बांधकामाची परवानगी घेऊन आले. १९४२मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला.

 *नारळासाठी गुराख्यांना स्थान दर्शन लाभ -*

स.न. १९२० ते १९२५ या काळात येथे कुणीही राहत नव्हते. जाळीच्या वेलांखाली दगड मातीचा ओटा मात्र बाधंलेला होता या आठवणी आजही सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सागंतात की पौर्णिमेचा दिवस असला की येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात, कारण या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

जाळीचा देव, अजिंठा-बुलढाणा रोडवर अजिंठयांहून पूर्वेस २९ किमी आहे. १).औरंगाबाद ते जाळीचादेव १२१, किमी आहे, २).जळगाव ते जाळीचादेव ९३,किमी आहे, ३).जालना ते जाळीचादेव (सिल्लोड अजिंठा रोडने) १३२, किमी, बुलढाणा रोडने १३२ किमी, वालसांगवीहून ईशान्येस जनूना रोडने ९ किमी आहे, हा पायी मार्ग आहे, जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस मिळतात.

 *स्थान माहिती - १ आसन स्थान ... हे स्थान सह्याद्री पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे,*

 *लीळा - चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळात फिरत असताना पूर्वार्धात सावळदबार्‍याहून भला मोठा सह्याद्रीचा पहाड चढून आले. नंतर तिथे काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे वालसांगवीकडे गेले, (वि.स्था.पो.क्र.१५२१* )

तात्पर्य- स्वामीनी जसा स्वतःचा थकवा घालविला त्याप्रमाणे त्यांना अनन्य भावाने शरण आलेल्या भक्ताचा शारीरिक मानसिक थकवा दूर करून आपल्याला असीम असा आनंद या स्थळी मिळतो.

भक्त के आठ प्रकार

*परमेश्वराचे आठ भक्त*

श्री. स्वामींच्या पूजा अवसराच्या वेळेसच प्रेमियाला प्रेमाचा संचार होत असतो. प्रत्यक्ष ईश्वरस्वरुपाचे दर्शन होते. ज्या भक्ताकडून पुरभजन घडले व अधिकारानुसार परमेश्वराचे सान्निधान, सेवा, भजन, दास्य घडत असून पुर्वजोडमध्ये प्रेमाचा घडलेला उपाय, त्यांनाच परमेश्वर प्रेमसंचार देतात. ते भक्त अतिशय भाग्यवान ठरतात. कारण " परमेश्वर भक्ताशी समोर देती ज्ञानियासी पाठीसी घालीती"

*१)* *पुरभजनिया भक्त* *:-*
उभयदृश्यावताराचे ठिकाणी भजन घडल्याने त्या भक्ताला प्रेम होते व तो भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. उदा : बाईसाला पूर्वी ईश्वरसेवा घडली होती. म्हणून ' घरी जाऊनी संबंध दिधला' व तिला प्रेम दिले.

२) *विषयप्रेमिया भक्त* *:-*
विषयप्रेम होण्यास आधी कोरावेध पाहिजे व ईश्वराचे ठिकाणी तसेच ज्ञानिया भक्ताचे ठिकाणी अत्यंत आवडी पाहिजे. विषयप्रेम होण्यास स्त्रीदेह ही पाहिजे. स्त्रीदेहीच विषयप्रेम होते. विषयप्रेमाची विशेषता ही आहे की, हे दुर्लभ आहे. सान्निधानी परमेश्वराचा वियोग सहन होत नाही. जर परमेश्वरानी वियोग दिला तर तो क्षणाचाही विलंब न करता देहाचा त्याग करतो. उदा. रुक्मिणी श्रीकृष्णाचे नांव एकताच तिला आवड उत्पन्न होऊन विरह सहन होत नव्हता. जर श्रीकृष्णाने तिला दर्शन दिले नसते तर तिने देह त्यागला असता.

*३) *आग्रहिया भक्त* *:-*
या भक्ताला परमेश्वराकारणे इतका आग्रह असतो त्या आग्रहास्तव प्रसन्न करून घेतो.
'एल्हो' ही आग्रह करून स्वीकारायला लावीत होती. परमेश्वरही जीवाला आग्रह करतात, " येथीची दशीच धरली पुरे" आग्रह करुन स्वीकारायला लावतात.

*४)* *तळमळिया भक्त* *:-*
परमेश्वराविषयी एवढी तळमळ असते की, तो केव्हा भेटेल, दिसेल, पाहील, अशी भावना होऊन तळमळ लागते. उदा. भट्टोबासांनी स्वामी जेव्हा सोडुन गेले होते तेव्हा आपला देह एवढा कृश करुन कशाचेही भान नसून बेशुद्ध अवस्था केली होती. " भक्त वियोगी नुरे" भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही.

*५)* *आत्महननिया भक्त* *:*परमेश्वराचा वियोग सहन होत नाही म्हणून आत्मघात करून देह त्यागतात.

*६)* *अवस्थाप्रगटिया भक्त*
या भक्ताला दहा अवस्था प्राप्त झाल्यावरच देहत्याग करतो. एवढी परमेश्वराचे ठिकाणी श्रद्धा असते. ' देव माझा मी देवाचा' ही भावना असते.

*७* *आइकत खेओजाय -*
हा भक्त उत्तम प्रेमिया असतो. तो समोर परमेश्वराची मुर्त नाही या शब्दाबरोबरच देहत्याग करतो. क्षणभरही राहु शकत नाही. उदा - महादेवब्राम्हणाने खोटी वार्ता एकताच देह त्यागला.

*८)* *उपाइया भक्त* *:-*
हा भक्त कनिष्ठ प्रकारचा असुन तो उपाय करुन देह त्यागतो.